‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’; अनिल बोंडे आणि पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची! पाहा व्हिडिओ
अमरावती | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा काल महाराष्ट्र सरकारने पुढे ढकलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे गंभीर पडसाद उमटले. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले. तसेच पुण्यात विद्यार्थ्यांनी शास्त्री रोडवर रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. अमरावतीमध्येही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतलं.
अमरावतीमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान महिला विद्यार्थिनींना पुरुष पोलिसांनी ओढून ताब्यात घेतल्याने माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे हे चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांचे पोलिसांसोबत खटके उडाले. पोलिसांवर आक्रमक झालेले बोंडे यांचा पोलीस निरीक्षक चोरमाले यांच्यासोबत कडाक्याचा वाद झाला. या सर्व प्रकरणानंतर बोंडे यांना ताब्यात घेण्यात आलं.
सलग पाचव्या वेळेस राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अमरावतीमध्ये अनिल बोंडे यांचा पोलिसांसोबत झालेला बाचाबाचीचा व्हिडिओ त्यांनी ट्विट करून संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे. बोंडे यांनी पोलिसांना ‘तुम्ही सरकारचे कुत्रे आहात’ असा उल्लेख केल्यानंतर अधिकाऱ्यानी रागात येऊन तुम्ही पण कुत्रेच आहात असं बोंडेंना सुनावलं यामुळे हा वाद आणखी वाढला.
या सर्व प्रकरणामुळे अमरावतीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. तसेच बोंडे आणि संबंधित पोलिस निरीक्षक चोरमाले यांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी राज्य सेवेच्या परीक्षेचं नवीन वेळापत्रक येणाऱ्या 8 दिवसातील तारखेपैकी एक तारीख निवडून लावण्यात येईल असं जनतेला संबोधित करत असताना सांगितलं. त्यामुळे आज काय तारीख घोषित होणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष्य लागलं आहे.
पाहा व्हिडिओ-
चोराप्रमाणे MPSC च्या विद्यार्थ्यांना आत मध्ये टाकलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा व 14 तारखेलाच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या. अन्यथा राज्यसरकारने परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे. भाजपा विद्यार्थ्यांसोबत आहे. @BJP4Maharashtra pic.twitter.com/A6QdFrpC7A
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) March 11, 2021
थोडक्यात बातम्या-
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू
संजना नाही तर आता ‘या’ माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव
मी मराठा म्हणून बोलत नाही; जगात जात हा प्रकार नसता तर…- उदयनराजे भोसले
“वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होते”
Comments are closed.