नवी दिल्ली | जगभरात रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद उमटत आहेत. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. अशातच आता युक्रेनची राजधानी कीव शहराला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी अचानकपणे भेट दिली आहे. या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की आणि बोरिस जाॅन्सन हे सुरक्षेच्या घेऱ्यात कीव शहरात फिरताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कीव शहरात रशियाच्या सैन्यानं प्रचंड नुकसान केलं आहे. पण युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
कीव शहरातील मुख्य क्रैशचॅटिक रस्त्यावरून ते मुख्य मैदानापर्यंत हे दोन्ही नेते आपल्या सुरक्षा घेऱ्यात वावरत होते. ब्रिटननं देखील काही दिवसांपूर्वीच रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. अशात या दोन्ही नेत्यांच्या भेटीनं सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, रशियन सैन्य कीव शहराच्या सीमेवर लाखोंच्या संख्येनं उपस्थित असताना जाॅन्सन यांनी हा दौरा केल्यानं युक्रेनला मोठी मदत होणार आहे.
because they bloody can pic.twitter.com/FaTUt0lvP6
— Ukraine / Україна (@Ukraine) April 9, 2022
थोडक्यात बातम्या –
‘अनिल देशमुखांची संपत्ती परत करा’; सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटाकारलं
पाकिस्तानात राजकीय उलथापालथ सुरूच; इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता
“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”
“राजीनामा देतो पण अटक करु नका”
Pakistan Political Crisis | इम्रान खानचं सरकार पडलं, पंतप्रधान पदावरून अखेर हकालपट्टी
Comments are closed.