हौसलों की दौड! दिव्यांग मुलीनं जिंकली सर्वांची मनं, प्रेक्षकही भावूक; पाहा व्हिडीओ
मुंबई | जीवनात जगत असताना प्रेरणा घेणं आणि प्रेरणेसह आयुष्य जगणं या महत्त्वाच्या गोष्टी असतात. मनात प्रेरणा असेल आणि काहीतरी करण्याची जिद्द असेल तर अशक्य देखील शक्य होतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील दिव्यांग मुलीची सर्वत्र चर्चा आहे.
शरीरानं सशक्त असुनही कारणं देत बसणाऱ्या व्यक्तींना आणि शरीरानं दिव्यांग असणाऱ्यांना या व्हिडीओनं प्रेरणा मिळत आहे. एका पायानं दिव्यांग असणारी लहान मुलगी धावण्याच्या शर्यतीत भाग घेते आणि इतर शरीरानं चांगल्या असलेल्या मुलींसोबत पळायला लागते.
सर्व मुली तिच्यापेक्षा लवकर शर्यत पुर्ण करतात पण ही मुलगी देखील मोठ्या जिद्दीनं शर्यत पुर्ण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोठ्या प्रमाणात शर्यतीचा हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओनं धुमाकुळ घातला आहे.
दरम्यान, उपस्थित सर्वांनीच या मुलीच्या धैर्याचं आणि जिद्दीचं कौतूक केलं आहे. मनात जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो हे या मुलीनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
पाहा व्हिडीओ –
Impossible is just an opinion 🙏🏼🙏🏼 pic.twitter.com/K1WJMb2Y8X
— Susanta Nanda IFS (@susantananda3) January 30, 2020
थोडक्यात बातम्या –
‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत
शेलारांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी”
“बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट मुख्यमंत्र्यांकडेच, पंतप्रधानांनी तर नाव घेऊन कानाखाली जाळ काढला”
राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला डोस, भाजपची रविवारी बूस्टर डोस सभा
Comments are closed.