बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आवरलं नाही रडू, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता तरी व्हिडीओ व्हायरल होत असतो. आता एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहूताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा हत्ती भर वस्तीत माणसांमध्ये येऊन आपल्या मालकाचं अंतिमदर्शन घेतानाचा हा व्हिडीओ आहे.

संबंधित माहूताचा मृतदेह एका ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. यावेळी काहीजण संबंधित हत्तीला माहूताच्या अंतिम दर्शनासाठी घेऊन येतात. यावेळी हा हत्ती बराच वेळ आपल्या मालकाकडे पाहात आहे. त्याचबरोबर आपल्या सोंंडेने माहूताला स्पर्श करण्याचा प्रयत्न ही करत आहे. पुढच्या काही क्षणातच हत्तीच्या डोळ्यातही अश्रूंच्या धारा सुरू झाल्याचं दिसत आहे.

आपल्या जीवाभावाच्या माणसांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर आपल्याला जेवढं दुःख होतं, तेवढंच दुःख प्राण्यांना देखील होतं. याचंच हे एक जिवंत उदाहरण आहे. आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आपलं दुःख लपवता आलं नाही.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र दक्षिणेकडील राज्यातील कुठलातरी राज्यातील असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण प्रचंड प्रमाणात भावनिक प्रतिक्रीया देत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

राज-उद्धव एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मराठा मोर्चा निघणारच’, विनायक मेटे आक्रमक; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार

हैराण करणारी बातमी! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोनाचा विषाणू

शिवकालीन ‘होन’च्या साक्षीने साजरा होणार यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा; संभाजीराजेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ; डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण पुन्हा कोरोना पाॅझिटिव्ह

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More