बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस हफ्ते कसे वसूल करतात?; आमिरच्या कार्यक्रमातील IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | काही वर्षांपूर्वी बाॅलिवूड अभिनेता आमिर खान यानं छोट्या पडद्यावर ‘सत्यमेव जयते’ हा शो केला होता. त्याचा हा शो खूपच गाजला होता. या शोमध्ये त्यानं वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपुर्ण चर्चासत्र घेतली होती. त्यातलाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या महाराष्ट्रात पोलीस आणि मंत्र्यांच्या भष्ट्राचाराचा मुद्दा चर्चेत आहे. त्याच अनुशंगाने भ्रष्टाचारावर भाष्य करणारा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

या कार्यक्रमात आमिरने आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना प्रश्न विचारला की, आपल्याला नेहमी असं दिसतं की, एखादा पोलीस किंवा काॅन्सेबल रस्त्यावर किंवा कोपऱ्यात जाऊन लाच घेतो. सामान्य माणूस असो की रिक्षाचालक सगळ्यांकडून तो लाच घेत असतो. मग तो चांगलीच कमाई करत असेल?, त्यावर पांडे यांनी आमिरच्या प्रश्नाच उत्तर दिलं.

तो करत असलेली कमाई जर त्याच्यापुरती मर्यादीत असती तर ती गोष्ट मान्य करायला काही हरकत नाही. पण तो बिचारा सगळी कमाई आपल्या घरी घेऊन जात असेल, यावर माझा विश्वास नाही. आपण सर्व लोकशाहीत राहतो. प्रत्येक व्यक्तीच्यावर कोणी तरी आहे. वरिष्ठ असतात, वरिष्ठांचे देखील वरिष्ठ असतात. अशी ही संपुर्ण साखळी असते. महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर डान्स बार आहेत. संघटीत इंस्टीट्युशनचं कलेक्शन वेगळं असतं. बजेटरी एक्टिमेशन जवळ जवळ सगळ्यांनाच माहित आहे. ही पुर्ण सिस्टीमच वेगळी आहे, असं संजय पांडे म्हणाले होते.

दरम्यान, मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप लावले आहेत. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद देशभर दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करून नेटकरी या विषयावर भाष्य करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या-

परमबीरसिंग यांना पहिला झटका; सर्वोच्च न्यायालयानं दिला ‘हा’ सल्ला

“देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार”

“तेव्हा मी खूप नाराज झाले होते”, रिंकू राजगुरुचा मोठा खुलासा

सरकारच्या अडचणीत आणखी वाढ; पुण्यातील कारागृह अधीक्षकाची ‘या’ कारणाने इच्छामरणाची मागणी

संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी सावनीची वाचा कहानी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More