बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करूणा शर्मा यांच्या गाडीत संशयित वस्तू ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ

परळी | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांच्यातील वाद आता पुन्हा समोर आला आहे. आज करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यावर गौप्यस्फोट करणार होत्या. मात्र, त्यांना स्थानबद्ध केलं गेलं. तर करूणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

दोन दिवसांपूर्वी करूणा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी परळीत येऊन गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं होतं. आज दुपारी त्यांची पत्रकार परिषद होणार होती. पण परळीत दाखल होताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करूणा शर्मा यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक वस्तू ठेवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करूणा शर्मा यांची गाडी जात असताना अचानक कार्यकर्त्यांनी गाडी अडवली. त्यानंतर करूणा शर्मा यांच्या विरूद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यावेळी एक महिलेने त्यांच्या गाडीच्या मागील दरवाजा हळूच उघडत त्यात एक वस्तू ठेवल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे करूणा शर्मा यांच्या गाडीच्या मागच्या भागातच पोलिसांना पिस्तुल सापडलं आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेनेच ही पिस्तुल ठेवली का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये काही पुरूष देखील महिलेला मदत करताना दिसत आहे. तर त्या ठिकाणी उपस्थित असलेली एक महिला पोलीस देखील झालेला हा प्रकार पाहत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता करूणा शर्मा यांना अडचणी आणण्यासाठी हा खेळ रचला गेला होता का?, असा सवाल आता नेटकरी करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“राज कुंद्रा भाजपात गेले तर ‘ते’ व्हिडीओ रामायणातील होतील का?”

राजू शेट्टी यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ प्रस्ताव

‘शरद पवारांवर आता फक्त पुस्तक यायचं बाकी आहे’; चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

“राणी बागेतील ‘पेंग्विन’ म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी”

‘भारताला महासत्ता बनायचं असेल तर…’; नितीन गडकरींनी दिला मोलाचा सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More