बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवांचा देव तु गंमपती…’; चिमुकलीने बोबड्या आवाजात लावलेल्या सुराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारे गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर दोन-तीन दिवसात एका चिमुकलीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. चिमुकली व्हिडीओमध्ये गणपत्ती बाप्पासाठीचं गाणं गाताना दिसत आहे. गाणं गाताना ती  गणपतीला गमपती असं बोलत आहे.

आपल्या बोबड्या बोलातून गणपती बाप्पाचं गाणं गात आहे. ती तिचं 100 टक्के देत गाण गात आहे मात्र तिचं गाणं कानावर पडलं की प्रसन्न झाल्यासारखं वाटत आहे. चिमुरडी स्टुडिओमध्ये गणेशाचं गाण गात आहे. गणपती नावाचा गमपती उच्चार करताना दीर्घ स्वर लावत आहे. हे गाण ऐकायला ही खुप छान वाटत आहे.

सुखकर्ता दुखहर्ता देवांचा देव तु गमपती, मनोभावे आम्ही तुझी करतो आरती…, असे गाण्याचे बोल आहेत. चिमुरडीने गाण्यात एक लय साधली आहे. काही बोल हे जलद गतीने तर काही बोल दीर्घ म्हटले आहेत.

दरम्यान, या चिमुरडीचे बोबडे बोल खुप आकर्षक वाटत आहेत. सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ सर्वात जास्त शेअर केला जात आहे. व्हाट्सअॅप स्टेटसला देखील अनेकांनी चिमुकलीचा व्हिडीओ ठेवला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘आम्ही बेडरूममध्ये असायचो तेव्हा…’; शरीरसंबंधाबाबत महिलेने पतीविरोधातच केली पोलिसात तक्रार!

‘शरद पवारांंना ‘तो’ अधिकार नाही कारण…’ ; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘…तर मी तुमचा ‘चड्ढा’ उतरवेल’; नवज्योत सिद्धूंवर केलेल्या ‘त्या’ टीकेमुळे राखीचा चढला पारा!

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More