कीव | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस भयावह रूप घेत आहे. रशियाकडून होत असलेले मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले यामुळे युक्रेन हादरलं आहे. युक्रेनमधील परिस्थिती बिकट असताना रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह खार्कीववरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.
रशियाने युक्रेनमधील रहिवासी वस्तीला निशाणा बनवलं आहे. मंगळवारी रशियाने युक्रेनमध्ये रस्त्याच्या मधोमध हल्ला केला. रशियाने केलेला हा मिसाईल हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रस्त्यावर जास्त रहदारी नसली तरी काही लोक गाडीतून जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
एक कार जात असताना अचानक रस्त्याच्या मधोमध मिसाईल डागण्यात आली. या मिसाईला प्रचंड मोठा स्फोट झाला. काही सेकंदातच आगीचा मोठा भडका उडाला. खार्किव येथे झालेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, युक्रेनच्या रस्त्यावर महाकाय रशियन सैन्याचा ताफा पसरला असल्याचं सॅटेलाईट फोटोतून समोर आलं. राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी रशिया शेवटच्या आणि मोठ्या ह्ल्याच्या तयारीत आहे. सैन्याची संख्या वाढवून रशिया मोठा हल्ला घडवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Missile attack on the Kharkiv regional administration, Sumska 64. Grad shelling at residential areas. Putin now in total war with Ukraine. pic.twitter.com/eXyfA4E4YI
— Maria Avdeeva (@maria_avdv) March 1, 2022
थोडक्यात बातम्या-
“भारतीयांनी तात्काळ कीव सोडावं”; भारतीय दूतवासानं दिल्या महत्त्वाच्या सूचना
पोस्टाची भन्नाट योजना, खातं उघडा आणि दरमहा मिळवा ‘इतके’ रूपये
“सत्ता जाण्याच्या भीतीनं उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर कारवाई करत नाही”
“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”
धक्कादायक! दोन वेळच्या अन्नासाठी ‘या’ ठिकाणी मुलं आणि किडनी विकण्याची वेळ
Comments are closed.