बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचं महागाई विरोधात ‘जागरण गोंधळ’ आंदोलन; मुरळीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

पुणे | देशातील विरोधीपक्ष केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. महागाई आणि इंधन दरवाढ यांसारख्या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि मित्रपक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. याच आंदोलनाचे विविध प्रकार आता पहायला मिळत आहेत. काल राष्ट्रवादीने मोदी मंदिरासमोर आरती आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखं जागरण गोंधळ आंदोलन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जागरण गोंधळ आंदोलनामध्ये चक्क मुरूळीला नाचवण्यात आलं होतं. तर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक देखील केला आणि केंद्र सरकारविरोधात घोषणा देखील दिल्या आहेत. महागाईने ग्रस्त जनतेच्या यातनांकडे सरकारने दुर्लक्ष केलंय. झोपेचं सोंग घेणाऱ्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आल्याचं राष्ट्रवादीने सांगितलं आहे.

‘प्रधानसेवक नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो… निर्मला अक्का तुम्ही जागरणाला या हो…’, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘बहोत हुई महंगाई की मार’ अशा फुशारक्या मारत नरेंद्र मोदी सत्तेत आले आहेत. मात्र, सत्तेच्या खुर्चीवर बसताच मोदींनी जनहित बाजूला ठेवलं. केंद्राने केवळ आपल्या उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काम केलंय, अशी टीका देखील चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी नुकतंच चर्चेत ठरलेल्या मोदी मंदिरासमोर आरती आंदोलन केलं होतं. पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी मंदिरासमोर साकडं घातलं आहे. त्याचबरोबर मंदिरासमोर पेट्रोल, डिझेल, तेल आणि मसाल्यांचा नैवेद्य देखील ठेवण्यात आला होता.

 

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

“बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप”

…अन् भीतीपोटी आईने काळजाच्या तुकड्याला सोपवलं सैन्याकडे; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

‘खाता का पिता वाल्या चाचांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘राज ठाकरेंच्या बोलण्यानं…’; जातीयवादाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More