बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बुलेटबंदी’ गाण्यावर रुग्णालयात नर्सचे ठुमके, आता मात्र सापडलीय संकटात!

नवी दिल्ली | आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजमाध्यमांमध्ये दिवसेंदिवस नविन काहीतरी पाहायला मिळते. अनेकजण आपल्या कला या माध्यमातून सादर करत असतात. काही व्हिडीओ पाहताच आपल्या ह्रदयात घर करतात तर काहीजण आपल्या कलेमुळे प्रचंड हसवतात. कोणी आपले गाणं गायलेले तर कोणी आपल्या डान्सचे व्हिडीओ सादर करत असतो. हल्ली अशाच अनेक गोष्टी व्हायरल होत राहतात. असाच एक नर्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

एक नर्स रूग्णालयात ड्युटीवर असतानाच डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, त्यामुळे नर्सच्या वरिष्ठांनी तिच्या कारवाई करत नोटीस जारी केली आहे. काही जणांना डान्स करायला आवडतं. काही मिळेल त्या ठिकाणी आपली कला दाखवत असतात. नर्स डान्स करतानाचा व्हिडीओ हा तेलंगणा राज्यातील राजन्ना सिरीसिला येथील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील आहे.

सदरील व्हायरल व्हिडीओत एक नर्स पांढऱ्या साडीवर बुलेटबंदी गाण्यावर डान्स करत आहे. नर्सच्या बाजूला इतरही नर्सही बसल्या आहेत. आजबाजूच्या नर्सही डान्सचा आनंद घेत होत्या. ट्विटरवर @Gvidya_Sagar नावाने एक अकाउंट आहे. त्या अकाउंटरून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, नेटकरी हा व्हिडीओ एकमेकांना शेअर करण्याबरोबरच यावर आगळ्यावेगळ्या कमेंट्स करत आहेत. नर्सचा डान्सची चांगलीच चर्चा आहे. तसेच हा डान्स नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. सध्या नर्स ज्योतीविरूद्ध नोटीस दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली?, राजकीय वर्तुळात एकच चर्चा

“आपल्याला धनुष्यबाणाचा विसर पडलेला पाहून फार वेदना होतात”

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, सपना चौधरीनंतर ‘या’ डान्सरची वाढतेय क्रेझ!

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर… ‘या’ नेत्यांचा झाला समावेश

अवघ्या 30 वर्षाच्या तरुणीचा ‘टीम नाना पटोले’मध्ये समावेश, पाहा कोण आहे ती?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More