बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दोन हजार दे तुझी गाडी सोडतो’; पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

लखनऊ | ट्रक ड्रायव्हरकडून लाच घेतानाचा पोलीस कर्माचाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरातील काकोरी पोलीस ठाण्यातील हा व्हिडीओ आहे. पैशांची सेटलमेंट करत असताना कुणीतरी त्याचा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ 13 मे 2021 चा असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस कर्मचारी ट्रक ड्रायव्हरकडून दोन हजार रुपयांची मागणी करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र चालक एक हजार रुपयांसाठी तयार होतो. है पैसे वरपर्यंत जातात, असं पोलीस ट्रक ड्रायव्हरला सांगतो.  त्यानंतर ट्रक ड्रायव्हर दोन हजार रुपये काढतो, असं या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय.

माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

या व्हिडीओचा तपास केला गेला आहे. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती  डीसीपी ख्याती गर्ग यांनी दिली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे

दगडाने ठेचून तरुणाची हत्या; भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला

YouTube कडून महिन्याला मला ‘इतके’ पैसे मिळतात- नितीन गडकरी

मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय, शिवसेना आमदार खूश, राष्ट्रवादीचा मंत्री नाराज!

“डिपॅाझिट जप्त झालेल्या माणसाला आमदारकी मिळाली फक्त अजितदादांच्या जपामुळे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More