बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडेट्टीवार चंद्रपूरमधील बार-मालकांसाठी बनले ‘देवमाणूस’; दारूबंदी उठवल्यानंतर वडेट्टीवारांची पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

चंद्रपूर | ठाकरे सरकारने चंद्रपुर जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला होता. 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यासाठी दारूबंदी लागू केली होती. मात्र या दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यानं राज्य सरकारने दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. दारूबंदी उठवल्यामुळे चंद्रपूरमधील बारमालक आणि मद्यप्रेमी भलतेच खूष झाल्याचं दिसत आहे.

अशातच चंद्रपूरमधील एका बारमालकाचा एक व्हिडओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवारांचा फोटो भिंतीवर असून बारमालक पूजा करताना दिसत आहे. सोशल मीडियावरील हा पूजा करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधाला असल्याचं उघड झालं आहे. संबंधित बारमाकाचंं नाव गणेश गोरडवार असल्याचं समजत आहे. शहरात पुन्हा आनंद आला आहे. विजय भाऊंनी खूप चांगलं काम केलं आहे. आम्हाला त्यांच्या कामाबद्दल इतका आनंद झाला की आम्ही थेट त्यांच्या फोटोची आरती केली. कारण ते आजच्या परिस्थितीत आमच्यासाठी देवच ठरले असल्याचं गणेश गोरडवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारचे वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसूलाचे मोठं नुकसान झालं असून गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. त्यासोबतच बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांचा वापर केला जात आहे. स्त्रिया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाल्याची कारणे सरकारने चंद्रपूरची दारूबंदी उठवताना दिली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

“मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा मोदींचा अधिकार”

गरोदर महिलांसाठी कोरोना लस सुरक्षित – डॉ. वीके पॉल

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा! 15 जुलैपासून ‘या’ गावांमध्ये शाळांची घंटा पुन्हा वाजणार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More