बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गर्दी वाढवण्यासाठी आम्हाला जबदस्तीने बोलवलं’; योगी आदित्यनाथांच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली |  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौंदोली जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. त्या कार्यक्रमात लोकांना पैसै देऊन बोलवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यासंबंधी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घडलेल्या प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित चंदोली या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर त्या कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या व्यक्तींना एका पत्रकारांनी प्रश्न केला. गर्दी वाढवण्यासाठी आम्हाला जबरदस्तीने बोलवलं होतं. त्यानंतर पत्रकारांनी त्या व्यक्तीला विचारलं की,  तुम्ही कोणाच्या बाजूने या कार्यक्रमाला आलं होतं. तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिलं की, आम्ही रेशन विभागाच्या वतीने आलो आहे.

पत्रकारांनी गर्दीतून बाहेर पडलेल्या दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न केला की, तुम्ही कोणत्या कारणांसाठी या ठिकाणी आला आहात. त्यावर ‘आम्ही या ठिकाणी पैसे घेण्यासाठी आलो होतो. परंतु आम्हाला पैसे दिले गेले नाहीत. त्यानंतर त्या पत्रकाराने एका महिलेला विचारलं असता, यावर मला काही माहित नाही, मला फक्त फोन करून बोलवलं आहे, म्हणून मी या कार्यक्रमाला आले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, चंदोलीमधील या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी एका वैद्यकीय महाविद्यालयाची पाया भरणी केली. यावेळी चंदोली लोकांसाठी मी 800 कोटी रूपयांची भेट आणली असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

पाहा ट्विट

थोडक्यात बातम्या-

नुकसान भरपाईसाठी ठाकरे सरकारकडून मदत जाहीर; पुणे विभागाला मिळणार सर्वाधिक ‘इतक्या’ कोटींची मदत

काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न; बच्चू कडूंवर गंभीर आरोप

चित्रा वाघ यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी; 80 नेत्यांच्या यादीत मिळवलं स्थान

पर्यावरणासाठी एक पाऊल! ‘वन्यजीव सप्ताह’ अंधारबन जंगलमध्ये साजरा

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More