Top News मनोरंजन

‘या’ मुलाचा व्हिडीओ पाहून शंकर महादेवन म्हणाले…’एकदा तरी त्याला भेटण्याची संधी मिळो’

Photo Courtesy-Instragram/shankar.mahadevan

मुंबई | प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह असतात. ते नवनवीन व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर करत असतात. अशाच एका चिमुरड्या शिक्षकाचा व्हिडीओ शंकर महादेवन यांनी शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये लहान मुलगा एका मुलीला गाणं शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. शंकर महादेवन मुलाचा आवाज, त्याची शिकण्याची पद्धत आणि सुरांबद्दलची समज बघून महादेवन अवाक झाले.

शंकर महादेवन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे की मी आतापर्यत पाहिलेला हा सर्वात गोड आणि सर्वात भारी संगीत शिक्षक आहे. त्याचा आवाज अगदी नैसर्गिक आहे. जणु काही जन्मजात मिळालेली भेट आहे. गाणं शिकवताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पहा. त्याचा उत्साह बघून समोरची चिमुरडी देखील आनंद घेत आहे, अशा शब्दात महादेवन यांनी चिरमुरड्या शिक्षकाची स्तूती केली आहे.

शंकर महादेवन यांनी चिरमुरड्या शिक्षकाला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकली नाही. व्हिडीओच्या फुटेजवरून हा चिमुकला सामान्य परिवारातील असावा असं दिसून येत आहे. या व्हिडीओला 3 तासातच 90 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी यांना ‘छोटा शंकर महादेवन’ तर काहींनी ‘भविष्यातील शंकर महादेवन’ असा उल्लेख केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”

“…अन्यथा तुम्हाला कोरोना झाल्यास सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही”

‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं

रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14 ची विजेती!

मुंबई महापालिका निवडणूकीसदंर्भात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या