नाशिक | पावसाळ्याचे दिवस आणि त्यात हिरवी झाडी, हिरवा डोंगर निसर्गाने हिरवळीची शालच घातली आहे. पावसाळा म्हटलं की प्रत्येकाला पावसाळी ट्रीप करायाला आवडतेच. रमणीय असं धबधब्यांना भेट देणं, गिर्यारोहण करणं यासाठी अनेक पर्यटक बाहेर पडतात. पाण्यात भिजत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने अशा काही पद्धतीने लुटत असतो. सध्या काही तरूणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोट्या प्रमाणात व्हायरल होतोय.
काही तरूण भररस्त्यात नागीन डान्स करताना दिसले. हा प्रकार नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यावर हा प्रकार घडला. याचा व्हिडीओ सोशल प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ मध्ये काही मुलं गाडीवरून ट्रिपला जाताना दिसत आहेत. अचानकपणे हे लोक रस्त्यावर एकत्र थांबतात. यामुळे तिकडून येणाऱ्या ट्रकने हार्न वाजवला आणि त्या हॉर्नची धून नागीन डान्सची असल्यामुळे ही मुलं रस्त्यावरच नाचू लागली. ही मुलं खूप विचित्रपणे नाचत आहेत. काही जण तर लोळत डान्स करताना दिसत आहेत.
घाट रस्त्यावरील एका मालवाहू गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर ते नाचत आहेत पण भर रस्तात अशा प्रकारचं धाडस करण धोक्याचं ठरू शकतं.
थोडक्यात बातम्या
महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा खेळ आता वेब सिरीजमध्ये दिसणार; “मी पुन्हा येईन” चा टीझर प्रदर्शित
खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती
टाटांचं टेन्शन वाढणार; महिंद्राच्या 4 जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लवकर बाजारात येणार
खुशखबर! 10 वी पास तरुणांना पोस्टात नोकरीची संधी; तब्बल इतक्या पदांसाठी भरती
Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
Comments are closed.