बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्यावसायिकासोबत शरीरसंबंध ठेवताना काढला व्हिडीओ, त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

अहमदनगर | अनेक वेळा आपण महिलेचा बलात्कार होऊन त्यादरम्यान तिचा व्हिडीओ काढण्यात आला असल्याच्या घटना ऐकतो. मात्र अहमदनगरमधील एका घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. येथील एका महिलेने शहरातील श्रीमंत व्यावसायिकासोबत आधी शरीरसंबंध ठेवले. यावेळी तिने एक व्हिडीओ देखील बनवला. मात्र त्यानंतर जे झालं ते अत्यंत धक्कादायक आहे.

नगर तालुक्यातील जखणगाव येथील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षाच्या महिलेने नगरमधील श्रीमंत व्यायसायिकाला शरीरसंबंध ठेवण्यासाठी घरी बोलावलं. 26 एप्रिलला घरी बोलवल्यानंतर महिलेने व्यावसायिकाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. यादरम्यान, महिलेने आपल्या साथीदाराच्या मदतीने व्हिडीओ चित्रीकरण केलं. त्यानंतर दोघे मिळून संबंधित व्यावसायिकाला धमकावू लागले.

संबंधित साथीदाराचे नाव अमोल सुरेश मोरे असं आहे. व्हिडीओ दाखवुन तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी महिला आणि तिच्या साथीदाराने दिली. त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाला दोरीने बांधून त्याला बेदम मारहाण करुन त्याच्याकडील 5 तोळे वजनाची सोन्याची चैन, 4 अंगठ्या आणि 85 हजार रुपये रक्कम हिसकावून घेतली. एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपयांचे सर्व सामान लंपास करण्यात आले.

दरम्यान, महिलेच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या साथीदाराला अटक करुन महिलेचा शोध लावला. त्यानंतर महिलेनं भावाच्या नावावर गहाण ठेवलेलं सोनं पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच महिलेने असा हनीट्रॅप अनेकांवर लावला असेल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या-

ऐकावं ते नवलच!, MPमध्ये नकली रेमडेसिवीर घेतलेले 90 टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

कोरोनामुळे घरातील व्यक्तीचा मृत्यू, समाजकंटकांनी शेतातील कांदा केला नष्ट

सारं घर कोरोनामुळे रुग्णालयात, वृद्ध आजी 2 दिवस अन्नपाण्याविना गोठ्यात, शेवटी…

“2022 मध्ये मोदी राष्ट्रपती बनतील, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावून ते स्वत: सरकार चालवतील”

अरबी समुद्रातील वादळाचं रौद्ररुप, पुण्यावर काय परिणाम होणार?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More