विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; कुणाची विकेट पडणार?

Vidhan Parishad election | विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज (12 जुलै) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मते फुटू नयेत म्हणून सर्वच पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचं दिसून येतंय. अशात क्रॉसव्होटिंग होण्याची शक्यता देखील (Vidhan Parishad election ) वर्तवली जात आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने एक अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरतेय. त्यामुळे आता नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

आज विधानभवनात मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळनंतर निकाल येण्याची शक्यता आहे. अशात (Vidhan Parishad election ) कॉँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील, असे भाकीत शेकाप नेते जयंत पाटील यांनी वर्तवविले आहे. या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसची मते महत्वाची आहेत.

कॉँग्रेसकडे 37 मते आहेत (Vidhan Parishad election ) आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ 23 मते लागणार आहेत. आता अतिरिक्त 14 मते ही नेमकी कुठे वळतात, यावरही सर्वांच्या नजरा असतील.

निवडणुकीच्या रिंगणात कोण?

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

शिवसेना (एकनाथ शिंदे)
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)(Vidhan Parishad election )
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)(Vidhan Parishad election )
मिलिंद नार्वेकर

शेतकरी कामगार पक्ष (शरद पवार समर्थन)
जयंत पाटील

News Title – Vidhan Parishad election voting

महत्वाच्या बातम्या :

कतरिना कैफ होणार आई?, सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

शत्रुघ्न सिन्हा यांना लाडक्या जावयाकडून मिळालं मोठं सरप्राईज!

रोज एक अक्रोड खाल्ल्याने मिळतील ‘इतके’ फायदे!

पावसाळ्यात रम प्यावी की ब्रँडी?, आरोग्यासाठी हे खरंच चांगलं आहे का?

“हिंदूंनो धर्म वाचवण्यासाठी कामाला लागा, नाहीतर…”; केतकी चितळेची पोस्ट प्रचंड चर्चेत