शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? तर आचार संहिता कधी लागू होणार; जाणून घ्या A टू Z माहिती

Politics l महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून 2024 ला जाहीर होणार आहे. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच आता निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक 4 जागांसाठी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यप्रणालीनुसार येत्या 26 जून 2024 रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी होणार मतदान :

या निवडणुकीतून दोन जागा शिक्षक व दोन जागा पदवीधरच्या भरल्या जाणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलै रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात ज्या 4 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागातील शिक्षक जागांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे 2024 रोजी या निवडणूकीसाठीचे प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. हे प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून त्या मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Politics l या निवडणुकीची अशी असणार कार्यप्रणाली :

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज : शुक्रवार, 7 जून 2024

या तारखेपर्यंत करता येणार अर्जांची छाननी : सोमवार, 10 जून 2024

या तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार : बुधवार, 12 जून 2024

या तारखेला होणार मतदान : बुधवार 26 जून 2024

या वेळेत मतदान पार पडणार : सकाळी 8 ते दुपारी 4

या तारखेला होणार मतमोजणी : सोमवार 1 जूलै 2024

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने महायुतीतील मुंबई पदवीधर उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. यावर आता भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने महायुतीत मुंबई पदवीधरसाठी शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा केली असली तरी भाजप नेते अनिल बोराणे यांनी त्याला विरोध केला आहे. या जागेवरून त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

News Title – Vidhan Parishad Padvidhar Election

महत्त्वाच्या बातम्या-

पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक व्यक्तीची एन्ट्री;…आता असं घडण्याची दाट शक्यता

मोठी बातमी! अंधाधूंद गोळीबारात माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

पुणे पोलिसांनी कॅफेवर टाकला छापा, अंधार करुन रंगला होता धक्कादायक खेळ

पुढील काही दिवसांत ‘या’ राशीच्या व्यक्तींना राजकारणातून गोड बातमी मिळेल

मनोज जरांगेंच्या जीवनावर आणखी एक सिनेमा येणार, तारीख आली समोर