नागरिकांनो ‘या’ पैकी कोणतेही एक कागदपत्र असले तरी करता येणार मतदान!

Election

Vidhan Sabha Election 2024 | महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडते आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य हे आज 20 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होणार आहे. (Vidhan Sabha Election 2024 )

राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल. नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करावयाचे आहे. मतदान करण्यासाठी मतदान कार्ड हे प्रमुख कागदपत्र आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे कागदपत्र नसेल तर निवडणूक आयोगने मतदानासाठी इतरही काही कागदपत्रांना परवानगी दिली आहे.

एकूण 12 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मतदान करता येणार आहे. मतदानकार्ड नसेल पण तुमचे मतदार यादीत नाव असेल तर इतर कागदपत्रांच्या आधारे देखील तुम्हाला मतदान करता येणार आहे. आता ते कागदपत्रे कोणते आहे, ते पाहुयात.

‘या’ कागदपत्रांसह मतदान करता येणार

1. पासपोर्ट

2. आधार कार्ड

3. पॅन कार्ड

4. ड्रायव्हिंग लायसन्स

5. मनरेगा कार्ड (Vidhan Sabha Election 2024 )

6. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं आयडी कार्ड

7. फोटो असलेलं पेन्शन कार्ड

कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिले?

महायुती

भाजप – 149 जागा
एकनाथ शिंदे यांची शिवसेना – 81 जागा
अजित पवार राष्ट्रवादी – 59 जागा (Vidhan Sabha Election 2024 )

महाविकास आघाडी

कॉँग्रेस – 101 जागा
शरद पवार राष्ट्रवादी – 86 जागा
उद्धव ठाकरे शिवसेना – 95 जागा

News Title – Vidhan Sabha Election 2024 Documents For vote

महत्त्वाच्या बातम्या-

288 जागांसाठी आज मतदान, महाविकास आघाडी vs महायुतीमध्ये चुरशीची लढत

स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींना मिळणार भरभरून यश, मोठं पदही मिळणार!

‘मतदानरुपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’; संभाजी पाटील निलंगेकर यांचं आवाहन

“स्क्रिनवर आपले कपडे…”, ऐश्वर्या रायकडून ‘त्या’ गोष्टींचा खुलासा!

भाजपकडून विनोद तावडेंचा गेम?; टीप कोणी दिली?, हितेंद्र ठाकुरांचा गौप्यस्फोट

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .