Vidhan Sabha Election 2024 | कॉँग्रेस खासदार राहुल गांधी आज 6 नोव्हेंबररोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडताना राहुल गांधी आज पाच गॅरंटींची घोषणा करणार आहेत. महायुतीने अगोदरच 10 मोठ्या घोषणा करत प्रचाराला सुरुवात केली आहे. आज महाविकास आघाडीकडूनही घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Vidhan Sabha Election 2024)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, नागपुरात दुपारी 1वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ ते उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट करणार असल्याचं बोललं जातंय.
‘या’ 5 घोषणा ठरणार गेमचेंजर
1. 15 लाख रुपयांपर्यंत विमा कवच
2. लाडक्या बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर 3 हजार रुपये महिलांना देण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता
3. महिलांना एसटीचा मोफत प्रवास
4. 3 लाखांपर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याची घोषणा
5. नोकरभरती संदर्भात कॅलेंडरप्रमाणे नियोजन करत सर्वाधिक नोकरभरती करणार
6. जातीनिहाय जणगणना
दरम्यान, महायुतीकडूनही 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती (Vidhan Sabha Election 2024) दिली.त्या खालील प्रमाणे आहेत-
महायुतीच्या 10 घोषणा
1.राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाह 2100 रुपये मिळणार. पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
3. प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
4. वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
5. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
6. राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
7. 45 हजार पांदण रस्ते बांधणार. (Eknath Shinde )
8. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
9. वीज बिलात 30 टक्के कपात.
10. शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार. (Vidhan Sabha Election 2024)
News Title : Vidhan Sabha Election 2024 MVA will announce
महत्वाच्या बातम्या –
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, ‘या’ नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
“भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा, तितकाच दाढीवाल्यांचाही”
लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये?, मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
स्वामींच्या कृपेने आज कुणाची मनोकामना पूर्ण होणार?, वाचा राशीभविष्य