Vidhan Sabha Election 2024 | येत्या विधानसभा निवडणुकीला फक्त काही महिने शिल्लक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. याला कारण ठरलंय जालना विधानसभेची जागा.
महायुतीत वादाची ठिणगी
जालना विधानसभेच्या (Vidhan Sabha Election 2024) जागेवरून खोतकर आणि दानवे (Arjun Khotkar vs Raosaheb Danve) पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण या जागेवर भाजपने दावा केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरती आता भाजपकडून दावा केला जातोय. तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे बंधू भास्कर दानवे यांनी जालन्याची जागा भाजपला सुटावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्यास म्हटलंय
भाजपच्या या दाव्यावरती शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी उपरोधिक टोला मारला आहे. रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार असलेल्या भोकरदन आणि भाजपच्या ताब्यातील बदनापूरच्या जागा दिल्यावर आपण जालन्याची जागा त्यांना सोडून देऊ, असंही त्यांनी म्हंटलय.
Vidhan Sabha Election 2024 | लोकसभेत दानवेंचा पराभव
जालना लोकसभा मतदारसंघात 5 वेळेस लोकसभेवर निवडून गेलेल्या रावसाहेब दानवेंना 2024 लोकसभा निवडणुकीत मात्र पराभव स्वीकारावा लागला. पाचवेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेसने ‘या’ 5 आमदारांचा विधानसभेचा पत्ता केला कट; पाहा कोण आहेत?
काल रात्री पुण्यात घडली धक्कादायक घटना; पुणेकरांची उडाली झोप
‘मी तरुण होते आणि एकटी रहायचे…’; महेश भट्ट यांच्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा
अजित पवार लाडक्या बहीण योजनेसंदर्भात लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेणार
मराठा, कुणबी दरोडेखोर आहेत का? आंबेडकरांनी ‘या’ नेत्याला दिल चोख प्रत्युत्तर