भाजपचे ‘हे’ 12 नेते शिंदेंच्या धनुष्यबाणावर तर 5 जण घड्याळच्या तिकिटावर रिंगणात!

Vidhansabha Election | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यात सर्वच पक्षांनी आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. या दोन्ही आघाड्यामध्ये तिकीट मिळालं नाही म्हणून अनेक जणांनी बंडखोरी केल्याचं दिसून आलं. तर, काही जणांनी तिकीट मिळावं म्हणून इतर पक्षात प्रवेश केलाय. विशेष म्हणजे, या आयारामांना निवडणुकीचं तिकीट देखील मिळालं आहे. राज्यात भाजपचे तब्बल 12 नेते भाजपकडून नाही तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले आहेत. ऐन निवडणुकीत त्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रवेश करत तिकीट मिळवलं आहे. आता हे नेते नेमके कोण आहेत आणि ते कोणत्या मतदारसंघातून लढणार आहेत, ते पाहुयात. (Vidhansabha Election)

भाजपचे 12 दिग्गज नेते धनुष्यबाणावर लढणार

निलेश राणे : भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते आता शिंदे गटाकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. निलेश राणे यांना कुडाळ-मालवणमधून उमेदवारी मिळाली आहे.

संजना जाधव : भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. कन्नड विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढणार आहेत.

राजेंद्र गावीत : भाजप नेते राजेंद्र गावीत हे देखील शिंदेंच्या सेनेत दाखल झाले असून ते पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Vidhansabha Election)

विलास तरे : भाजपमध्ये असलेले विलास तरे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत बोईसरमधून विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळवलं आहे.

संतोष शेट्टी : भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत संतोष शेट्टी हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरले आहेत.

मुरजी पटेल : भाजपमध्ये अनेक वर्ष काम करत असलेले अंधेरीतील दिग्गज नेते मुरजी पटेल यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. (Vidhansabha Election)

अमोल खताळ : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अमोल खताळ निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी देखील भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलाय.

शायना एन सी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना मुंबादेवीमधून शिंदे गटाकडून तिकीट मिळालं आहे.

अजित पिंगळे : भाजपमधून शिंदे गटात प्रवेश करत अजित पिंगळे यांनी देखील निवणुकीचं तिकीट मिळवलं आहे. ते धाराशिवमधून निवडणूक लढवणार आहेत.

दिग्वीजय बागल : करमाळा विधानसभा मतदारसंघात दिग्वीजय बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विठ्ठल लंघे : नेवासामध्ये विठ्ठल लंघे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वी ते भाजपमध्ये होते.
त्यांनी नेवासामधून तिकीट मिळवलं आहे. (Vidhansabha Election)

बळीराम शिरसकर : उद्धव ठाकरेंचे उमेदवार नितीन देशमुख यांच्याविरोधात बळीराम शिरसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते देखील यापूर्वी भाजपमध्ये होते.

अजित पवार गटात गेलेल्या ‘या’ भाजप नेत्यांनाही तिकीट

1. राजकुमार बडोले
2.प्रताप पाटील चिखलीकर
3. निशिकांत पाटील
4.संजय काका पाटील (Vidhansabha Election)

News title –  Vidhansabha Election 12 BJP leaders in election from Shindesena

महत्त्वाच्या बातम्या-

ऐन दिवाळीत उडणार महागाईचा भडका?, 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नियमांत बदल होणार

“बेबी..आपली लव्हस्टोरी रामायणापेक्षा कमी नाही”; सुकेशचं जॅकलिनला आणखी एक पत्र

आज नरक चतुर्दशी, कुणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार?; वाचा राशीभविष्य

2024 मध्ये ‘या’ पक्षाचा असणार मुख्यमंत्री; राज ठाकरेंचं भाकीत

अमित शाह महाराष्ट्रात जादूची कांडी फिरवणार? ‘इतक्या’ सभा घेणार