School Holiday l विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सुट्टी असणार की नाही यावरून पालकवर्ग देखील संभ्रमात आहेत. मात्र अशातच आता राज्यातील राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना मतदानाच्या दोन दिवस आधी सुट्टी असल्याच्या मुद्द्यावरुन संभ्रम असतानाच आणखी एका पत्रकानं यामध्ये भर टाकली आहे. मात्र आता शाळेतील सर्व शिक्षकांना निवडणूक कामांसाठी नियुक्त केल्यास जवळच्या शाळेतील शिक्षकांची निवड करून 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरु ठेवण्याची सूचना शिक्षण आयुक्तालयानं जारी केली आहे.
सुट्ट्यांवरून पालकवर्ग संभ्रमात :
मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्र असणाऱ्या मुंबई पालिकेच्या शाळांना उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबरला सुट्टी असणार आहे. यासंदर्भातील माहिती भूषण गगराणी यांनी दिली आहे. अशातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांच्या व्यवस्थापना संदर्भात नाव पत्रक जारी केलं आहे. यामुळे पालकवर्ग देखील संभ्रमात आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा 18 व 19 नोव्हेंबर रोजी सुरू राहणार असल्याने मुख्याध्यापकांच्या मदतीनं यासंदर्भातील नियोजन गटशिक्षण अधिकाऱ्यांनी करावं असं देखील आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे.
School Holiday l शाळा आणि शिक्षकांनी केली सुट्टीची मागणी :
दरम्यान, संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र आणि मतदान यंत्र हे जमा करायला एकूण 40 ते 45 तासांचा कालावधी जातो. मात्र अशा परिस्थितीमध्ये कित्येकदा मतदान केंद्रांनजीकच या मतदान कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना मुक्काम ठोकावा लागत असतो.
मात्र मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना शाळा गाठणं शक्य होत नाही. त्यामुळे 21 तारखेच्या दिवसाची गणती कर्तव्याचा दिवस म्हणून करत शिक्षकांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी देखील शाळा आणि शिक्षकांनी केली आहे.
News Title : Vidhansabha school holiday date
महत्वाच्या बातम्या –
“माझा भांग वाकडा करू शकेल, असा कुणी पृथ्वीवर नाही”; भाजप खासदाराचं वक्तव्य
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह अंगलट, फटाक्यांची ठिणगी उमेदवाराच्या केसावर पडली अन्..
मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना ‘या’ उमेदवारावर जीवघेणा हल्ला, कोल्हापुरात खळबळ
आज संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होणार!
मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का