Manoj Jarange l राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नेतेमंडळींकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मोठं विधान केलं आहे.
700 ते 800 उमेदवार इच्छुक :
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील तब्बल 700 ते 800 इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क देखील साधला आहे. तसेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचं फार भयाण काम आहे.
कधी कधी उमेदवार पाहिले की वाटतं कुठून या लफड्यात पडलो आहे. त्यामुळे यावेळी मरणाचे उमेदवार जास्त आहेत. कारण माझ्याकडे तब्बल 700 ते 800 उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Manoj Jarange l पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवार :
सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेसाठी मराठवाड्यातून देखील अर्ज येत आहे. मात्र सर्वात जास्त उमेदवार हे पश्चिम महाराष्ट्रातून आहेत. त्यानंतर नंबर 2 ला मराठवाडा आहे. तसेच आम्ही त्यासाठी लोक देखील बसवले आहेत. कारण मला त्यातल जास्त काही जमत नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
पुढे मनोज जरांगे म्हणाले की, आज सर्वात विशेष गोष्ट मला मराठा समजाला सांगायची आहे. पण सरकार डाव टाकतेय, हे समाजाला सांगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सरकारने अवघ्या दोन दिवसात नवीन डाव टाकला असून त्यांनी निवडणुकाच डिसेंबर महिन्यामध्ये ढकलल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते असं ते म्हणाले आहेत.
News Title : Vidhansabha Election Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका!; अदिती तटकरेंचे बँकांना महत्त्वाचे आदेश
पावसाळ्यात ‘या’ भाज्या खा; संसर्गाचा धोका होईल कमी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा झटका!
“बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्यानेच..”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप