आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम; तर ‘हे’ 9 जण सोडचिठ्ठीच्या तयारीत!

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला गळती लागली आहे. पक्षातील नेत्यांनी पवारांची साथ सोडत पक्षांतराचा निर्णय घेतल्याचं वारंवार दिसून येत आहे.

आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या 20 नेत्यांनी पक्षाला रामराम करत ‘कमळ’ हाती घेतलं तर कोणी ‘शिवबंधन’ मनगटावर बांधून घेतलं आहे.

राष्ट्रवादीला सोडण्याच्या तयारीत असलेल्यांच्या यादीतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदिप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले हे देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पक्षांतराचा फटका सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेसला बसत असून विधानभेच्या तोंडावर पवारांची चिंता वाढल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

-खरं बोललो तर जीवाला धोका- राजू शेट्टी

-‘या’ महत्वाच्या प्रश्नासाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी पंढरपुरमध्ये एकाच मंचावर!

-‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या धनुष्यबाण उचलण्याच्या तयारीत?

-ईडी, आयकर विभाग मोदींच्या तालावार नाचतात- राजू शेट्टी

-राष्ट्रवादीला नको होतं तेच घडलं, चित्रा वाघ यांनी उचललं हे मोठं पाऊल!