….अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार!

Vidhansabha Elections 2024 | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा केली. आता राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य विधानसभेची (Vidhansabha Elections 2024) मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे निकालानंतर सरकार बनवण्यासाठी फक्त तीन दिवस असणार आहे. अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार आहे.

बहुमत मिळालेल्या युती किंवा आघाडीकडून 24 नोव्हेंबर रोजी बैठक बोलवण्यात येणार आहे. त्यात युती किंवा आघाडीच्या नेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजीच राज्यपालांकडे जाऊन सरकार बनवण्याचा दावा करणार आहे.

‘…अन्यथा राष्ट्रपती राजवट लागणार’

राज्यपाल 25 नोव्हेंबर रोजी बहुमत असणाऱ्या सरकार बनवण्यासाठी बोलवणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी समारंभ घ्यावाच लागणार आहे. येणाऱ्या काळात सरकार कशाप्रकारे आणि किती अवधीत निर्णय घेतील, यावर राष्ट्रपती राजवटबाबतचा निर्णय अवलंबून आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर युती एकत्र राहिली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबतीने पहाटे शपथ घेतली. परंतु ते सरकार काही तासांचं होतं.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले आणि उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली, त्यानंतर एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर पडले. भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री लाभले.

महत्त्वाच्या बातम्या- 

माजी खासदाराच्या पुतण्याने केली आत्महत्या!

अजितदादांना मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर 600 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

विधानसभेपूर्वी रुपाली चाकणकरांची मोठी खेळी!

आज राज्यातील ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

संतापजनक! ठाण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, नराधम निघाला ‘या’ पक्षाचा पदाधिकारी