मनोरंजन मुंबई

विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या ‘शेरनी’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र हे शुटींग थांबवण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे  मंत्र्याचं डिनरसाठीचं आमंत्रण स्वीकारलं नसल्याने चित्रीकरण थांबवलं असल्याचं  ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तात सांगितलं आहे.

काही दिवसांपुर्वी विद्या बालनला मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांचं हे आमंत्रण विद्याने स्वीकारलं नाही. त्यानंतर काही दिवसात चित्रीकरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं समजत आहे.

विजय शाह यांच्यावर जरी हे आरोप लावले जात असले तरी त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. चित्रपटाची टीम माझ्याकडे चित्रीकरणासाठी परवानगी मागण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनीच मला लंच आणि डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं.

दरम्यान, मीच हे आमंत्रण नाकारलं होतं. पण त्यावेळी मी त्यांना चित्रीकरणासाठी परवानगी दिली असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते- नारायण राणे

संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये काय चर्चा रंगली?; राऊतांची महत्त्वाची पोस्ट

शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या, नाहीतर… बच्चू कडूंचा मोदींना इशारा

कंगणा राणावत पुन्हा अडकली नव्या वादात; ट्रोल होताच काढला पळ!

“तुमच्या मेव्हण्याची जिरवली, आता तुमचीपण जिरवू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या