मुंबई | इंडस्ट्रीत नवीन असताना अनेकदा मला भूमिका मिळेल असं वाटायचं आणि ती भूमिका मिळायची नाही. तो काळ संघर्षाचा होता. त्या काळात मी देखील अनेक रात्री रडत घालवल्या आहेत, असं अभिनेत्री विद्या बालनने सांगितलं आहे.
विद्या बालनची भूमिका असलेला मिशन मंगल हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच पार्श्वभूमीवर तिने सिनेसृष्टीतल्या आणि मालिका विश्वातल्या प्रवासाबाबत तिचं मतं व्यक्त केलं आहे.
सिनेमाची परंपरा असलेल्या कोणत्याही घरातून मी आले नाही. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीची तीन वर्षे माझ्यासाठी वाईट होती. मी त्यावेळी रडायचे, झोपायचे आणि या आशेवर उठायचे आणि दिवसाला सुरुवात करायचे की चला आज काहीतरी चांगले होईल, असं विद्याने सांगितलं आहे.
दरम्यान, काही काळानंतर मी परिणिता सिनेमा केला. परिणिताने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली, असं विद्या म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातच विखे पाटलांचं संपर्क कार्यालय सुरू!
-पूर ओसरताच पुन्हा चालू होणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा!
-रामदास आठवलेंची सांगली-कोल्हापूरच्या पुरग्रस्तांना 50 लाखांची मदत
-कोथरुडमधून मेधा कुलकर्णींचा पत्ता कट???, ‘या’ नेत्याला तिकीट मिळण्याची शक्यता!
-…तर मी शिवसेनेची हमी मी घेतो- रावसाहेब दानवे
Comments are closed.