“बारामतीकरांच्या विरोधात भुंकण्यासाठीच गोपीचंद पडळकरांना आमदारकी दिलीये”

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. मंगळसूत्र चोरणारे आमदार झालेत, असं म्हणत विद्या चव्हाण यांनी पडळकरांवर बोचरी टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर यांना स्वतःचं डोके आहे का? चोऱयामाऱया करून, महिलांची मंगळसूत्रे चोरून ते आमदार झाले आहेत. केवळ बारामतीकरांच्या विरोधात भुंकण्यासाठीच त्यांना आमदारकी दिली आहे, अशी जहरी टीका चव्हाण यांनी केलीये.

विद्या चव्हाण आज पंढरपुरात खासगी कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पडळकर यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार व त्यांच्या कुटुंबावर भुंकत राहण्यासाठी त्यांनी आमदारकी दिलीये. या व्यतिरिक्त त्यांना काहीही काम नाही. त्यामुळे पडळकर यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नसल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

पडळकरांना काहीही काम नाही. त्यामुळे पडळकर यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नसल्याचं विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-