बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्या चव्हाणांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; सुन डॉ. गौरी चव्हाणांची टीका

मुंबई | विद्या चव्हाण यांनी माझ्यावर विवाहबाह्य संबंधांचे खोटे आरोप केले आहेत. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं चव्हाण यांची सून डॉ. गौरी चव्हाण यांनी म्हटलं आहे. माध्यामाशी त्या बोलत होत्या.

दिराने माझा लैंगिक छळ केल्याचा करत आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. मला न्याय हवा आहे. यासाठी मी लढा देणार असल्याचं गौरी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मला आणि मुलीला धक्के देत मारत बाहेर काढलं. त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर पोलिसांनी एफआयआर घेतला नाही. प्रज्ञा अजिंक्य यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केल्यावर एफआयआर दाखल करु घेतल्याचं गौरी यांचे वडील अरुण सावंत यांनी सांगितलं.

दरम्यान, माझी सून कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळे असं वागत आहे. कायदा दुधारी शस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. परंतु कोणी त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईची भाषा मराठीच; चंपक चाचाने मागितली जाहीर माफी

मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोेध हे हिमताने सांगावं; फडवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवावेत- राहुल गांधी

मुख्यमंत्रिपद जाताच देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं पुस्तक; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रकाशन

मोदींनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णायाचं रोहित पवारांकडून कौतूक पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More