“चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं उघड..”; ‘या’ महिला नेत्याचा थेट इशारा

Chitra Wagh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरप केले होते. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे.

आता या राजकीय लढाईत दोन महिला नेत्यांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु झाल्याचं चित्र दिसून येतंय. शरद पवार गटाच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना त्यांचे कारनामे उघड करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

इतकंच नाही तर, आज 30 जुलैरोजी दुपारी 3 वाजता याबाबत त्या पेन ड्राइव्ह सुद्धा दाखवणार आहेत. झालं असं की, अनिल देशमुख यांनी आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा खुलासा केला.

त्यावर फडणवीस यांनी पुरावे द्या, असं म्हटलंय. या वादात नंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उडी घेतली. अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु, असं आव्हान चित्र वाघ यांनी दिलं होतं. यालाच शरद पवार गटाच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना थेट धमकीच दिली आहे.

आज दुपारी 3 वाजता विद्या चव्हाण पेन ड्राइव्ह दाखवणार

“फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं. यात कसला आला पराक्रम अनिलबाबू. अनिल देशमुखांना माझा सवाल आहे, आम्ही तुमच्याकडे पुरावे मागितलेत, ते तुम्ही का देत नाहीये? एकदा तुम्ही पुरावे द्या, मग त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पदार्फाश करणारे पुरावे आमच्याकडे सज्ज आहेत”, असा इशाराच चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिला होता. त्यावर विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“चित्रा वाघ काय-काय बोलते आणि काय-काय करते, तिचे कारनामे या पेन ड्राइव्हमध्ये आहेत. 3 वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये चित्रा वाघचे सगळे कारनामे उघड करणार. महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खर रुप दाखवल्याशिवाय राहणार नाही.”, असा इशाराच विद्या चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे आज 3 वाजता त्या पेन ड्राइव्हमध्ये काय उघड होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title –  vidya chavan warn to bjp leader chitra wagh

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आंदोलकांचा ताफा थेट ‘मातोश्री’वर; अंबादास दानवे म्हणाले, ही भाजपची माणसं..

मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

रामदेव बाबांना हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ प्रकरणी पतंजली आयुर्वेदला मोठा दंड

“एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून…”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अश्लीलतेचा कळस! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली चक्क प्रग्नेन्सी टेस्ट, Video व्हायरल