बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो, पण…’; समोर आली ही महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट थोपवायची असेल तर प्रत्येकाचं लसीकरणं होणं गरजेचं. हेच विदेशात झालंय, त्यामुळे तिथे चांगल्याप्रकारे व्हॅक्सिनेशन झालंय. आपल्याकडेही मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची गरज आहे, असं मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या डीन विद्या ठाकूर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होऊ शकतो. पण तुमचा जीव जाणार नाही. कोरोना झाला तर लक्षणंही सौम्य असतील, असा दावा डीन विद्या ठाकूर यांनी केला आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

गर्दीच्या ठिकाणी जाणं लोकांनी टाळावं, सोशल डिस्टन्सचं पालन करतानाच वारंवार हात धुणं गरजेचं आहे. कारण गर्दीत कोविड पसरण्याची शक्यता दाट आहे, ही गर्दी जीवघेणी ठरू शकते, प्रत्येकाने त्रिसूत्रीचं पालन करावं. नियम कुणीही मोडता कामा नये, नाहीतर परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते, असा इशाराही विद्या ठाकूर यांनी दिलाय.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. राज्यात काल दिवसभरात तब्बल 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 695 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 53 हजार 335 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“…तर मग कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?”

“याला म्हणतात ठाकरे ब्रँड; राजसाहेबांचं पत्र गेल्यावरच आली हाफकिनची परवानगी”

उच्चशिक्षित आईनं 6 महिन्यांच्या चिमुकलीसोबत केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!

“पोलिसांना मदत करा, त्यांना चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही द्या”

…तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More