नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे, असं वक्तव्य राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे. दिवंगत सरसंघचालक गोळवळकर गुरुजींच्या नावावर रामटेक येथे शैक्षणिक संकुल सुरु करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते.
संघाने प्रत्येक व्यक्तीचे मत आणि धर्माचे पालन करणाऱ्यांच्या अधिकारांचा नेहमीच सन्मान केला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
डाॅ. के बी हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. संघाचा प्रवास पाहता तो शानदार पण कठिण राहिला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संघासमोर सर्वात मोठे आव्हान गांधी हत्येनंतर निर्माण झाले होते, असं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-“आर. आर. आबा असते तर अण्णांना इतके दिवस उपोषण करावं लागलं नसतं”
–आमचं दैवतचं उपाशी मग आम्ही कसं खाणार??, राळेगणमधल्या मुलाची भावनिक प्रतिक्रिया
–नांदेडची स्वराली जाधव ठरली ‘सूर नवा-ध्यास नवा’ची महाविजेती
–अखेर तीन दिवसांनंतर ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन मागे
–काँग्रेस मुख्यालयात लागली ‘प्रियांका गांधी-वाड्रा’ नावाची पाटी, भावा शेजारी बहिणीची केबीन!