अभिनेता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात; लंडनमध्ये घेणार सात फेरे?
नवी दिल्ली | अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) याला कंमाडो या चित्रपटातून अधिक पसंती मिळाली. 2011 पासून त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. सध्या मात्र विद्युत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विद्युत जामवाल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या वर्षी त्यांने त्याची प्रेयसी नंदितासोबत एंगेजमेंट (Engagement) केली होती. नंदिताही सध्या लंडनला असते. त्यांच्या एगजमेंटची बातमी खूप दिवसांनी समोर आली होती. आता मात्र दोघं लग्न करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघं लंडनमध्ये लग्न करणार आहेत.
येत्या पंधरा दिवसात दोघंही लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी विद्युत लंडनला (London) लवकरच रवाना होईल. या दोघांचं लग्नही झालं असल्याचं सांगितलं जात आहे.
अभिनेता विद्युत जामवालचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘खुदा हाफिज 2’ (Khuda Hafiz: Chapter 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. हा एक अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटातील विद्युतच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात त्याने अप्रतिम अँक्शन केले आहेत. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन फारुक कबीर यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या
मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
कॉमेडियन वीर दासने पुन्हा उडवली भारताची खिल्ली, म्हणाला…
धक्कादायक! गुजरातमधून 350 कोटींचं हेराॅइन जप्त
‘या’ कारणामुळे मुख्याध्यापकाचा पगारच कापला, कारण ऐकून नेटकरी संतापले
मुर्मू की सिन्हा? शिवसेना कोणाला पाठींबा देणार?, वाचा सविस्तर
Comments are closed.