Top News राजकारण

विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. यानंतर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली.

दरम्यान विहंग याला ईडी अधिकाऱ्यांनी आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र आज विहंग सरनाईक चौकशीसाठी गैरहजर राहिले होते.

ईडीद्वारे विहंग यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. समन्स बजावून देखील ते गैरहजर राहिले. विहंग यांना आतापर्यंत अनेकवेळा समन्स बजावण्यात आले असून सोमवारी त्यांना चौथा समन्स बजावण्यात आलेला.

आज 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांना हजर राहायला सांगण्यात आलेलं. मात्र चौथ्या समन्सनंतरही ते ईडी कार्यलयात हजर झाले नाहीत. यामुळे आता विहंग यांच्यावर ईडीद्वारे कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

महत्वाच्या बातम्या-

“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”

‘या’ कारणामुळे न्यूझीलंडमधून पाकिस्तानचा संपूर्ण संघ होऊ शकतो हद्दपार!

उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय

रश्मी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या