बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा ‘पृथ्वी’ वादळाचा तडाखा; गोलंदाज हतबल होऊन पाहातच राहिले!

मुंबई | पृथ्वी शॉ या मुंबई संघाच्या कर्णधाराने विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात मयांक अग्रवालचा विक्रम मोडीत काढला. मयांक अग्रवालने 2018 मध्ये 723 धावा करून नवा विक्रम आपल्या नावे करून घेतला होता. आता पृथ्वी शाॅ याने हा विक्रम मोडीत काढला आहे.

पृथ्वीने 122 बॉल मध्ये 7 षटकार आणि 17 चौकार मारून कर्नाटकच्या बॉलरचा धुरळा उडवला. यंदाच्या सीझनमध्ये पृथ्वी शाॅ याने तिसऱ्यांदा 150 हून अधिक धावांची खेळी केली आहे. पहिल्यांदाच बॅटिंग करत असताना यशस्वी जयस्वाल हा अवघे 6 रण काढून बाद झाल्याने मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला होता. पण पृथ्वीने 79 बॉल मध्ये शतक पूर्ण करून विजयी खेळी केली.

पृथ्वी शॉ हा विजय हजारे ट्रॉफीच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन ठरला आहे. एकाच सीझनमध्ये पृथ्वी शाॅ ने 754 धावा करत धडाकेबाज खेळी केली आहे.

पृथ्वीच्या दमदार खेळीने त्याने आपल्या नावे नवा विक्रम केला आहे. पृथ्वीने चौकार आणि षटकार मारून 24 बाॅलमध्ये 110 धावा करून विक्रमी खेळी केली. या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा देवदत्त पड्डिकल याचा 673 धावांचा विक्रम होता. पृथ्वीच्या धमाकेदार खेळीने त्याचाही विक्रम मोडीत निघाला आहे.

थोडक्यात बातम्या

सेक्स न करताच तरुणी प्रेग्नंट झाल्यानं खळबळ, डॉक्टरही झालेत हैराण

आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हावी; ‘या’ खेळाडूच्या मागणीनं खळबळ

मंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ

बाईकवर स्टंट करताना दोघे आपटले, बघणाऱ्याच्या अंगावर येईल काटा; पाहा व्हिडीओ

कुख्यात गुंड गजा मारणेला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद; पाहा CCTV फुटेज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More