Vijay Kadam | मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी आज (10 ऑगस्ट) शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांचं निधन झालं. 1980 आणि 90 च्या काळात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केलं. त्यांच्या निधनाने सिनेविश्वात (Vijay Kadam) शोककळा पसरली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. ‘टूरटूर’, ‘सही दे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी आपल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
विजय कदम आणि पद्मश्री जोशी यांची लव्हस्टोरी
विजय कदम यांची पर्सनल लाईफही खूपच रंजक राहिली आहे. त्यांनी प्रेमविवाह केला आहे आणि त्यांच्या पत्नी या प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या आहेत. विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी ह्या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.(Vijay Kadam)
‘नणंद भावजय’, ‘पोरीची धमाल बापाची कमाल’, ‘नवलकथा’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. विजय कदम आणि पद्मश्री जोशी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. सर्वप्रथम विजय कदम यांनी पद्मश्री यांना लग्नाची मागणी घातली. त्यांनी दोन वेळा लग्नाची मागणी करूनही पद्मश्री यांनी नकार दिला होता. पण, ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकातील विजय कदम यांची भूमिका बघून पद्मश्री या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि प्रेमाचा होकार दिला.
खूप जणांना हे माहिती नाही पण, पद्मश्री जोशी आणि पल्लवी जोशी ह्या सख्ख्या बहिणी आहेत. तसेच प्रसिद्ध संगीत शिक्षिका सुषमा जोशी या यांच्या आई. पल्लवी जोशी या विजय कदम यांच्या नात्याने मेव्हणी आहेत. पल्लवी जोशी या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
विजय कदम यांचं निधन
आज विजय कदम यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. आज राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला.वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. मात्र, आज विजय कदम यांची ही झुंज अपयशी ठरली.
विजय कदम यांचे ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ आणि ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे चित्रपट खूप गाजले आहेत. आता त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत(Vijay Kadam) एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कलाविश्वातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.
News Title : Vijay Kadam Padmashri Joshi Love story
महत्त्वाच्या बातम्या-
“अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत”; राज ठाकरेंचं वक्तव्य
“माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही..”; राज ठाकरेंचा इशारा
कमी बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत
राज ठाकरेंचा शरद पवार-उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाले..
‘या’ अभिनेत्रीसोबत शुभमन गिल अडकणार लग्नबंधनात?