सिनेविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

Vijay Kadam | मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी आज (10 ऑगस्ट) शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांचं निधन झालं. 1980 आणि 90 च्या काळात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केलं. त्यांच्या निधनाने सिनेविश्वात (Vijay Kadam) शोककळा पसरली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आज दुपारी 2 वाजता विजय कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. अंधेरी येथील स्मशानभूमीत विजय कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षापासून ते कर्करोगाशी लढा देत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Kadam (@vijaykadamofficial)

विजय कदम यांचं निधन

मात्र, आज विजय कदम यांची ही झुंज अपयशी ठरली. विजय कदम यांचा पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. आज राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

विजय कदम यांनी रंगभूमीसोबतच (Vijay Kadam) मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे. त्यांचं ‘विच्छा माझी पुरी कर’ हे लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम खूप गाजलेला आहे. यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले.

विजय कदम यांचे चित्रपट

विजय कदम यांचे ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ आणि ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे चित्रपट खूप गाजले आहेत. आता त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत(Vijay Kadam) एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कलाविश्वातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.

News Title :  Vijay Kadam Passed Away

महत्त्वाच्या बातम्या-

विनेश फोगाटला मेडल मिळणार?, अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

पावसाची विश्रांती; ‘या’ तारखेनंतर पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

या 2 राशींवर शनीदेव नाराज? नुकसान होण्याची शक्यता

14 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरचा रोमांन्स, व्हिडीओ होतोय व्हायरल!

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!