बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैसे घ्या अन् प्रकरण मिटवा; कर्जबुडव्या विजय माल्ल्याची भारताला विनवणी

नवी दिल्ली |  भारतीय बँकांना 9 हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या मद्यसम्राट विजय माल्याने प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्याबाबत लंडन कोर्टात परवानगी मागितली होती. या प्रकरणात लंडनच्या कोर्टात माल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात सुनावणी झाली.

या प्रकरणातील एका सुनावणीत लंडन कोर्टाकडून माल्याला दिलासा मिळाला आहे. याच दरम्यान माल्याने पैसे परत घ्या पण हे प्रकरण संपवा, असं ट्वीट करुन पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत हे मी पहिल्यापासून सांगतोय. देव आहे त्यामुळे मला न्याय मिळणार. आता कोर्टानेही मला दिलासा दिला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, मी सगळे पैसे बॅंकाना परत देण्यास तयार आहे, असं माल्ल्यानं म्हटलंय.

पैसे परत घ्या, सर्व अकाऊंट क्लीअर करा. मी सर्व गुंतवणुकदारांचे आणि कर्मचाऱ्यांचेही पैसे देऊ इच्छितो. सर्वांचे पैसे देऊन मला जीवनात पुढं जायचं आहे, असं विजय माल्याने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रोहित शर्माच्या सिक्सरने चाहती जखमी; रोहितने केलं ‘हे’ अन् खुलली तिची कळी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी धोक्यात?

-हे पहायला पुन्हा यायचंय का?; राष्ट्रवादी युवकचा मुख्यमंत्र्यांना सवाल

….म्हणून इलाहबादच्या न्यायाधीशांनी मोदींना लिहिलं पत्र

-माझ्या वयावरून बोललात तर याद राखा; सुरेखा पुणेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More