ईडीचा मल्ल्याला दणका, अलिबागचं अलिशान फार्महाऊस जप्त

मुंबई | भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून परदेशी पलायन केलेल्या विजय मल्ल्याला ईडीने चांगलाच दणका दिलाय. ईडीने मल्ल्याचं अलिबागमधलं सुमारे 100 कोटी रूपयांचं फार्महाऊस ताब्यात घेतलंय. मांडवा इथल्या समुद्र किनाऱ्यालगत तब्बल 17 एकर जागेवर हे फार्म हाऊस आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी या फार्महाऊसवर तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता याठिकाणी राहणाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं असून हे फार्महाऊस ताब्यात घेण्यात आलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या