भारतीय न्यायाधीशांपेक्षा पाकिस्तानचे न्यायाधीश तटस्थ!

भारतीय न्यायाधीशांपेक्षा पाकिस्तानचे न्यायाधीश तटस्थ!

लंडन | भारतीय न्यायाधीशांपेक्षा पाकिस्तानचे न्यायाधीश तटस्थ आहेत, असं विजय मल्ल्याचे वकील क्लारे मॉन्टगोमरी आणि मार्टिन लाऊ यांनी वेस्टमिन्स्टर न्यायालयात सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून विजय मल्ल्याने लंडनला पलायन केलंय. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. मात्र वेगवेगळी कारणं सांगून मल्ल्या हे प्रत्यार्पण लांबवण्याचा प्रयत्न करतोय. 

निवृत्तीनंतर चांगले पद मिळावे यासाठी भारतीय न्यायाधीश सरकारच्या बाजूने न्याय देतात, असा मल्ल्याच्या वकिलांचा दावा आहे. भारतीय प्रसारमाध्यमांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

Google+ Linkedin