Top News

शिवसेना नेते विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

मुंबई |  शिवसेना नेते आणि मंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रूग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.

आज सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना लगोलग रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

दोन वर्षांपूर्वीसुद्धा त्यांना हृदयाचा त्रास झाल्याने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी योग्य ते उपचार त्यांनी करवून घेतले होते.

दरम्यान, शिवतारे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-या प्रमुख आश्वासनासह प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा केला प्रसिद्ध!

-तुमची चूक नसेल आणि नोटीशीत काही तथ्य नसेल तर घाबरू नका- गिरीश महाजन

-पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश लांडगेंनी घेतला स्तुत्य निर्णय

-तिकीट नाकारलेल्या किरीट सोमय्यांकडे भाजपने सोपावली ही जबाबदारी!

-छोट्या दानवेंकडे भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या