बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

पुरंदर | बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे राजकारण करावं लागलं, पण पुरंदर हवेली त्या दिशेने 9 वर्षात आगेकूच करत आहेत आणि तेच सुप्रिया सुळेंना बघवत नाही, अशी बोचरी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.

गेल्या चार वर्षांत पुरंदर हवेलीत प्रचंड कामे झाली आहेत त्यामुळे राष्ट्रवादी सैरभर झाली आहे. कामाच्या मुद्द्याला सुप्रिया सुळे बगल देतात,  असंही शिवतारे म्हणाले. ते पुरंदरमध्ये बोलत होते.

आपण काम करून सेल्फी काढा आणि जनतेला दाखवा, असाही संदेश यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंना दिला.

 दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या कामावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. 

महत्वाच्या बातम्या –

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण

-तेलंगणात पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह