मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. काही आमदार, नेते आणि पदाधिकारी स्वत: हून शिवसेनेला राम राम करून निघून जात आहे तर काहींना शिवसेना स्वत: नारळ घरपोच करत आहे. आता शिवसेनेने आणखी एका मोठ्या नेत्याला पक्षातून काढले आहे. पुरंदर (Purandar) तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना पक्षातून काढले असल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आणि पक्षाची शिस्त मोडल्यामुळे त्यांना शिवसेनेने शेवटचा जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तसेच शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहेत. शिवतारे यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. ते शिंदे गटात जात असल्याचा निर्णय त्यांनी नुकताच जाहीर केला होता.
एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र दौरा करणार आहेत. तर दुकरीकडे एका मागे एक करत, जुने शिवसैनिक पक्षाला सोडून शिंदे गटाकडे आकर्षित होत आहेत. शिवसेनेला पुन्हा नव्याने पक्षबांधणी करावी लागत आहे.
एकनाथ शिंदे हे पुरंदर तालुक्याकडे महत्वाची पावले टाकत आहेत. शिंदे यांच्याकडून पुरंदर तालुक्याचा आढावा घेतला जाणार आहे. विजय शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यात मुंबईहून निरीक्षक पाठवून बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला कार्यकर्त्यांना हजर रहाण्याचे आदेश देखील दिले गेले आहेत. तेव्हा आता ह्या बैठकीला कोण कोण हजेरी लावणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता…
“4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की…”
उद्धव ठाकरे जबरदस्त कमबॅक करण्याच्या तयारीत; घेतला मोठा निर्णय
“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाज्या महागल्या; दर आणखी वाढण्याची भीती
Comments are closed.