बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू- विजय शिवतारे

पुणे | शिवसेना नेते संजय राऊत रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या वडगाव शेरीत त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मोळावा पार पडला. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ललकारलं आहे.

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढणार, असा इशारा शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. शिवतारेंनी  जाहीर सभेत अजित पवारांना इशारा दिला आहे.

मावळमध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात बारणे यांना निवडून आण्यासाठी आपण ताकतीने लढलो आणि आपली सीट आणली. त्यामुळेच या गोष्टीची खुन्नस खाऊन विजय शिवतरे कसा निवडून येतो असे हे लोक म्हणायचे, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी नाही झाली तर शिवतारे आणि अजितदादा यांच्यातील कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

थो़डक्यात बातम्या- 

“जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा”

हर्षल पटेलची हॅट्रिक! हार्दिक, पोलार्ड आणि राहुलला दाखवला घरचा रस्ता

बंगळुरूचा राॅयल विजय! मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी दारूण पराभव

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

नाना पटोले म्हणतात, “मी बोलतो तेच करतो, दादापेक्षा नाना मोठा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More