मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं नाही, अखेर ‘त्या’ एका फोनमुळे घेतली माघार!; शिवतारेंचा गौप्यस्फोट

Vijay Shivtare | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटातून सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या गटातून सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. मात्र यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र आता ते बॅकफुटला आले आहेत. यामुळे अजित पवार यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी महायुतीविरोधात केलेलं बंड आता शमल्याचं पाहायला मिळत आहे. शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक न लढवण्याचा शिवतारे यांनी निर्णय घेतला आहे.

माघार घेण्याचं कारण आलं समोर-

मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्यानंतरही शिवतारे माघार न घेण्यावर ठाम होते. मुख्यमंत्र्यांसह महायुतीकडूनही शिवतारेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र अखेर एका फोनमुळे शिवतारे यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय बदलून माघार घेतली आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो, पण मुख्यमंत्री शिंदेचे OSD खतगावकर यांच्या एका फोनमुळे मी माघार घेतली आणि एकनाथ शिंदेंसाठी हा निर्णय घेतल्याचं शिवतारेंनी सांगितलं आहे.

काही दिवसांआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि विजय शिवतारे एकत्र आले होते. यावेळी गुंजवणीचं पाणी पुरंदरला देऊ, असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं.

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याचा निर्धार विजय शिवतारे यांनी केला होता. वर्षा बंगल्यावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, विजय शिवतारे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी विजय शिवतारे माघार घेणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर शनिवारी शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माघार घेतली असल्याची माहिती समोर आली.

अखेर बारामतीचा तिढा सुटला-

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीत विजय शिवतारे यांनी उडी घेतली. ते बारामती लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ठाम होते. पवार पर्व संपवण्यासाठी त्यांचा निर्धार होता. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.

विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं होतं. मात्र शिवतारे यांनी माघार घेतल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा तिढा सुटला आहे.

News Title – Vijay Shivtare U turn About Baramati Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या

लखनऊ विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक, आज पंजाबविरुद्ध रंगणार सामना

मोठी बातमी! नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक

‘दादर स्टेशन उडवून टाकू’, धमकीच्या फोन कॉलने खळबळ

कमी बजेटमध्ये कार खरेदी करायची? तर या टॉप 5 कार आहेत सर्वात बेस्ट

बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्याची मुलगी आहे सर्वात श्रीमंत; संपत्ती ऐकून व्हाल थक्क