बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विजय शिवतारेंच्या मुलीचे खळबळजनक आरोप, फेसबुक लाईव्हद्वारे आईचं प्रत्युत्तर

मुंबई | शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या आणि आई-भाऊ यांच्यातील कौटुंबिक वाद सध्या शिगेला पोहोचला आहे. संपत्तीसाठी भावांकडून वडील विजय शिवतारेंचा मानसिक छळ होत असल्याचा खळबळजनक आरोप विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवदीप लांडे यांनी केला आहे. त्यावर आता विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझी मुलगी डॉ. ममता शिवदीप लांडे हिने केलेली पोस्ट मी वाचली. या पोस्टमध्ये तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्याविरुद्ध केलेले आरोप खोटे आहेत. वास्तविक पाहता गेल्या 27 वर्षापासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत आहे. त्यातील 5 वर्ष ते उज्वला बागवे हिच्यासोबत लग्न करून राहत होते, असं मंदाकिनी विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. फेसबूक लाईव्हद्वारे त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

उज्वला बागवेनंतर आतापर्यंत ते मीनाक्षी रमेश पटेल हिच्यासोबत राहत आहेत. ते सध्या पवई येते वास्तव्यास आहेत. या बाबतीत संपत्ती हा वादाचा विषय नसून मानसिक छळवणूक थांबवणे आणि स्वतःची या जाचातून मुक्तता करून घेणे, हा माझा व माझ्या कुटुंबीयांचा एकमेव हेतू आहे, असं स्पष्टीकरण मंदाकिनी शिवतारे यांनी दिलं आहे.

दरम्यान, आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय, विनस आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे. असा आरोप ममता यांनी केला आहे. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयूमध्ये रात्री दोन वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले आहे, असंही ममता यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा”

कसोटी विश्वचषकाच्या फायनलवर पाणी; सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More