बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विजय वडेट्टीवर यांच्या खात्यानं दिला MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला!

मुंबई | एमपीएससीची पुर्व परीक्षा परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातून राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. ही परीक्षा रविवार, 14 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार होती. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर अधिकृत पत्रक काढूून माहिती दिली आहे. या पत्रकामध्ये मंत्रिमंडळातील मंत्री विजय वडेट्टीवारांच्या खात्याने परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पर्व परीक्षा 2020च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10 मार्च, 2021 रोजीच्या पत्राद्वारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आलं आहे.

राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी,  असं पत्रकात म्हटलं आहे. तर त्याखालील सूचनेत शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा2020 ही पुढे ढकलण्यात येत आहे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यभरातून परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र सरकारने कोरोनाचं कारण देत ही परीक्षा पुढे ढकलल्याने थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं जात आहे मात्र पत्रकामध्ये विजय वडेट्टीवारांच्या खात्याचं नाव असल्याने आता ते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे- देेवेंद्र फडणवीस

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घ्या”

“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More