बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाॅकडाऊनबाबत विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. त्यातच काॅंग्रेसचे नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. राज्यात सध्या लाॅकडाऊन नको. मात्र, कठोर निर्बंध लावावे लागतील. लोकल वेळापत्रक रिशेड्युल करावं लागेल. मंगल कार्यालयावर वाॅच ठेवावा लागेल, असं वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र व केरळ या दोन राज्यातच देशातील 65 ते 70 टक्के रुग्ण आहे. हे दोन्ही राज्य हाॅटस्पाॅट झाले आहेत. पण लाॅकडाऊन करावं लागेल असं मला वाटत नाही. अजून निर्बंध लावावे लागतील हे नक्की, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

गर्दी कमी करावी लागेल. मार्केटमध्ये निर्बंध आणावे लागतील. सिनेमाघर बंद करावी लागतील. परिक्षांबाबत तामिळनाडू सरकारने सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रालाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल. परिक्षा घ्याव्या लागतील असं अनेक लोक सांगतात. मात्र, आॅनलाईन परिक्षांबाबत तपासणी करतोय, असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी यासंदर्भात स्वत: माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रकाश आमटे यांना ताप येत होता. पण तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मनमोहन सिंग नेहमी संकटांचा सामना करायचे, तुम्ही पळ काढत आहात- संजय राऊत

रॉबर्ट वाड्रा करणार राजकारणात एन्ट्री; केली ही मोठी घोषणा!

‘अजब सरकारची गजब कहाणी’; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

“संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

‘भालचंद्र नेमाडे देशी दारू पिऊन…’; पूजा चव्हाणची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More