बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार’; ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याचं वक्तव्य!

सोलापूर | भटक्या विमुक्त जाती आणि ओबीसी जातीचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी ओबीसींच्या आरक्षणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडायलाही तयार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींना आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू. गरज पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.  चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे इशारा करत आम्हाला मोदींकडे घेऊन चला, अशी साद देखील वडेट्टीवारांनी घातली.

आरक्षणासाठी रस्त्यावर देखील उतरू, तरीही आरक्षण मिळालं नाही तर घोंगडी आणि हातात काठी घेऊ. त्याचबरोबर आमचा मराठा समाजावर रोख नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा अजिबात विरोध नाही आहे. उलट त्यांना आमचा पाठिंबा आहे.  मात्र हात जोडून विनंती करतो की, प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नका, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  भटक्या विमुक्त जाती-जमाती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी 31 ऑगस्टला मेळावा पार पडला होता.  आजच्याच दिवशी सोलापूरात भटक्या विमुक्तांना मुक्त करण्याचे काम झाले होते.  मात्र समाजाच्या दृष्टीकोणाला आजही आम्ही बदलू शकलो नाही, असंही वड्ट्टीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी”

मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे भोसले घेणार राष्ट्रपतींची भेट

“2024 च्या निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार”

“तुम्ही फक्त काळजी घ्या, त्या फेरीवाल्याचं काय ते आम्ही बघू”

हिला कोणीतरी साडी नेसायला द्या, मल्लिका शेरावत झाली ट्रोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More